प्रियकराच्या मदतीने पतीच्या तिजोरीतील पैसे चोरून पतीचीच दिली खूनाची ‘सुपारी’

दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमध्ये खूनाची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचून पतीच्या तिजोरीतील पैसे चोरले. यानंतर तिने एका सुपारी किलरला पतीचा खून करण्यासाठी हे पैसे दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकरला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. हा प्रकार भलसवा डेअरी परिसरात घडला आहे. पोलिसांनी पत्नी विशाखा आणि तिचा प्रियकर अमितला अटक केली आहे. प्रमोद असे गोळ्या झाडून खून करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

विशाखा आणि अमित यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. विशाखाला तीन मुले असून पती प्रमोद हा आपल्या प्रेमामध्ये अडथळा होत असल्याने तिने अमिच्या मदतीने पतीचा खून करण्याचा कट रचला. विशाखाने पतीचा खून करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली. सुपारी किलरला ५० हजार रुपये आगाऊ रक्कम देण्यासाठी तिजोरीची बनावट चावी बनवून घेतली. पतिच्या तिजोरीतून पैसे चोरून ते पैसे तिने सुपारी किलरला दिले. सुपारी किलरने प्रमोदच्या मंगळ बाजार रोडवरी दुकानात जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडून खून केला.

सीसीटीव्हीमुळे आरोपी गजाआड
या घनटनेनंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावेळी या प्रकरणात त्याच्या घरच्यांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी विशाखाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने अमित याच्यासोबत मागील दोन वर्षापासून संबंध असल्याची माहिती दिली. तिने एके दिवशी अमितला घरी बोलावले होते. त्यावेळी प्रमोदने त्याला घरातून हकलून दिले होते. या संबंधाला पती प्रमोद हा अडथळा होत असल्याने तिने अमीतच्या मदतीने प्रमोदचा काटा काढण्याचा कट रचून त्याचा खून केल्याची कबुली दिली.

दीड लाखात दिली खूनाची सुपारी
प्रमोदचा खून करण्यासाठी अमितने दोघांना सुपारी दिली होती. त्यासाठी अमितने दोघांना दीड लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी त्याने विशाखाकडून ५० हजार रुपये घेऊन खून करणाऱ्या दोघांना दिले होते. उर्वरीत रक्कम खून केल्यानंतर एका आठवड्याने देण्याचे ठरले होते. खूनाची सुपारी देण्यासाठी लागणारे पैसे विशाखाने पतीच्या तिजोरीची दुसरी चावी बनबवून त्याद्वारे पैसे चोरले होते. पोलीस खून करणाऱ्या दोघांचा शोध घेत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

Loading...
You might also like