संशयावरून पत्नीचा खून कराणाऱ्या ‘त्या’ पतीस जन्मठेप

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन- पती पत्नीचे नाते हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असते. परंतु नात्यात जर विश्वासाची जागा संशयाने घेतली तर ते नाते उध्वस्त होते. यातून खुनाचेही प्रकार समोर येतात. अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा खून केला आहे. बकरा कापण्याच्या सुरीने बकरा कापावा तसा पत्नीचा निघृणपणे खून करण्यात आला आहे. दोघे पती-पत्नी मुलीच्या सासरी गेल्यानंतर हा भयानक प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे मुलीसह तिच्या सासू-सासर्‍यांसमोरच हा खून करण्यात आला होता. नामदेव जमलू राठोड (वय 55, रा. नागनहळ्ळी) असे पतीचे नाव असून त्याला सोलापूरचे अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश मोहिते यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

अक्‍कलकोट तालुक्यातील नागनहळ्ळी गावात राहणारा नामदेव जमलू राठोड याची मुलगी जयश्री अशोक चव्हाण हिच्या सासरी (शिवाजीनगर, लमाणतांडा, अक्‍कलकोट) येथे असतांना तिला भेटण्यासाठी म्हणून गेले होते. नामदेव नेहमीच तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. दोन दिवस त्यांनी मुलीच्या सासरी मुक्कामही केला. परंतु  4 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास नामदेव राठोड याने नेहमीप्रमाणे पत्नी लालूबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरासमोरील अंगणात भांडण काढले. यात नामदेव भयंकर संतापला होता. त्याने डोक्यात संशय ठेवत त्याने घरात जाऊन बकरा कापण्याचा सुरीआणली आणि  सुरीने पत्नी लालूबाई हिचा गळा चिरून खून केला होता. मुलगी जयश्री, तिची सासू घुम्माबाई हिच्यासमोरच त्याने हे क्रूर कृत्य केले होते. तेवढ्यात तेथे  जावई अशोक व व्याही पूनमचंद हेदेखील घरी आले.

जावई आणि व्याही यांनी ताबडतोब गंभीर जखमी झालेल्या लालूबाईस रुग्णालयात दाखल केले. यानंतर क्रूर नामदेव मात्र सुरी पाण्याने धूत बसला होता. त्यांनी ताबडतोब गंभीर जखमी झालेल्या लालूबाईस दवाखान्यात हलविले. तेव्हा नामदेव राठोड हा ती सुरी पाण्याने धूत बसला होता. या खूनप्रकरणी आरोपी नामदेव  राठोड याच्याविरुद्ध  कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिकारी पी.पी. सुर्वे यांनी करून आरोपी नामदेव राठोड याला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खून प्रकरणाचा खटला सोलापूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहिते यांच्यापुढे चालला. या खटल्यात सरकारच्यावतीने अ‍ॅड. शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले. मुख्य म्हणजे यात सरकार पक्षाच्यावतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले.  न्यायाधीशांनी दोन्हा बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी नामदेव राठोड याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.