मतदान केंद्राच्या धर्तीवर लसीकरण केंद्राची स्थापना

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – दिवाळीनंतर देशात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली त्यामुळे सर्वच राज्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंलबजावणी केन्यास सुरुवात केली आहे. तर काही राज्यांनी लॉकडाउनही लागू केला. दरम्यान मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोरोना प्रतिबंधक लस सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदान केंद्राच्या धर्तीवर सर्वत्र लसीकरण केंद्रांची स्थापना केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

कोरोना लस कधी उपलब्ध होईल याची ठोस अशी माहिती कोणालाही नाही परंतु लसीकरण मोहिमेसंदर्भात निती आयोगाचे सदस्य आणि कोरोना प्रतिबंध लस कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी एक सादरीकरण केले. निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे मतदान केंद्रांची स्थापना केली जाते त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी लसीकरण केंद्रे स्थापन केली जातील व या केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविली जाईल, असे पॉल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शीतकोठारांची साखळी अधिक मजबूत करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. ही शीतकोठारे कोविन एपशी संलग्न करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

दरम्यान लस येत नाही तोपर्यंत सर्वत्र कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी पाेहाेचेल लस
पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाईल
आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणात प्राधान्य
लसीकरण केंद्रांची गटनिहाय स्थापना
सरकारी आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर लसीकरण मोहिमेची जबाबदारी
मोहिमेशी संबंधित लोकांना प्रशिक्षित केले जाईल
जनसहभाग वाढविण्यावर भर दिला जाईल

कोरोनाची सद्य:स्थिती

दिल्ली : दररोज सरासरी १११ बाधितांचा मृत्यू
महाराष्ट्र : दररोज सरासरी ९० बाधितांचा मृत्यू

You might also like