‘तुला लवकरच थोबाडणार’, मनसेची जान कुमार सानूला थेट धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंगर जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) यानं बिग बॉसमध्ये मला मराठी भाषेची चीड येते असं विधान केलं होतं. यानंतर आता महाराष्ट्र नविनिर्माण सेननं आक्रमक भूमिका घेत त्याला थेट धमकी दिली आहे. मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं सानू तेच बघतो मी, असा थेट इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिला आहे.

बिग बॉस 14 (Bigg Boss 14) मध्ये स्पर्धक निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेली नक्की तांबोळी मराठीत बोलत होती. यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते असं त्यानं म्हटलं. यानंतर आता मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, जान कुमार सानू…. मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतो याला.

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहली की, मुंबईत राहून तर तुझं करिअर कसं बनतं जान सोनू तेच बघतो मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबाडणार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्स वाहिनीनं हा सीन खरंतर वगळायला हवा होता. पण एडिट केलं नाही ते बरं झालं. गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.

कोण आहे जान कुमार सानू ?
जान कुमार सानूचं मूळ नाव जयेश भट्टाचार्य आहे. तो प्रसिद्ध गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांचा मुलाग आहे. संगीत क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकायचं असल्यानं मी माझ्या नावापुढं त्यांचं नाव लावतो असं जाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं.