दिल्ली विधानसभा : ‘भाजप-शिरोमणी अकाली दला’ची युती तुटली, ‘या’ 4 जागांवर अकाली दल स्वबळावर लढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाची दिल्लीतील युती तुटली आहे. दोघांमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीतील जागांसाठी कोणतीही तडजोड न झाल्यानं ही युती तुटली आहे. शिरोमणी अकाली दलानं सध्या आपल्या चार उमदेवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितलं आहे. यात राजौरी, कालकाजी, हरिनगर, शाहदरा या जागांचा समावेश आहे. पक्षाचं म्हणणं आहे की, पक्ष आता अधिकागिक जागांवर निवडणूक लढू शकतो.

‘या’ जागांवर लढू शकतं अकाली दल
अकाली दलाची नजर सदर बाजार, मोती नगर, पटेल नगर, कृष्णा नगर या विधानसभा जागांवर आहे. सुरुवातील जागांच्या संख्येत वाढ करण्यासाठी दबावाचं राजकारण केल्यानंतर अकाली दलानं माघार घेतली होती. जागावाटप करताना 2015 च्या फॉर्म्युल्यानुसार, तडजोड करण्यास पार्टी तयार होती. अकाली दलानं भाजपकडे चार जागांची मागणी केली होती.

भाजपनं जेडीयुला दिल्या 2 जागा
भाजप आणि जेडीयु युती करत दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दिल्ली जेडीयु अध्यक्ष दयानंद राय यांनी सोमवारी सांगितलं की, दिल्लीत भाजप आणि जेडीयु सोबतच निवडणूक लढवेल. भाजपनं जेडीयुला 2 जागा दिल्या आहेत. बुराडी आणि संगम विहारमधून जेडीयु उमेदवार देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए महाआघाडीनुसार, दिल्लीत लोक जनशक्ती पार्टीला एक जागा दिली जाण्याची शक्यता आहे. सीमापुरीमधून एलजेपी(लोकशक्ती जनता पार्टी) उमेदवार मैदानात उतरवू शकतं. एलपीजेनं याआधी 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like