गडकरी साहेब, जातीचे राजकारण करणाऱ्या मोदींना कुठे ? कधी ? कुठल्या चौकात ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधकांकडून मी खालच्या जातीचा असल्याने अनेकदा माझ्यावर टीका केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूजच्या सभेत केला होता. या आरोपानंतर राष्ट्रवादीने एक ट्विट केले आहे. यामध्ये नितीन गडकरी यांना ‘गडकरी साहेब, कुठे? कधी? कुठल्या चौकात?’ असा प्रश्न विचारला आहे. हा विचारण्या मागचे कारण म्हणजे नितीन गडकरी यांनी पिंपरी चिंचवड मधील एका सभेत जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेल असे म्हंटले होते. याचाच आधार घेत राष्ट्रवादीने नितीन गडकरी यांना खोचक प्रश्न विचारला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील एका कार्य़क्रमात जातीयवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता आणि एकतेवर आधारित समाज संघटन होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. यावेळी बोलताना त्यांनी ‘जो जातीचे नवा काढेन त्यांना मी ठोकून काढेन’ असे म्हटले होते. गडकरीच्या याच वक्तव्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींवर निशाणा साधाला आहे. मी मागास असल्याने काँग्रेसने मला शिव्या दिल्या असे वक्तव्य करणाऱ्या मोदींचा गडकरी कधी समाचार घेणार अशा अक्षयाचे ट्विट राष्ट्रवादीने केले आहे.
राष्ट्रवादीने केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी काल जातीवर आपल्यावर टिका होत असल्याचे केलेले वक्तव्य आणि गडकरी यांचे जातीचं नाव काढणाऱ्यांना फोडून काढण्याचं वक्तव्य बाजूबाजूला पोस्ट असलेला फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये फोटोबरोबर केवळ ‘गडकरी साहेब, कुठे?, कधी? कुठल्या चौकात?’ असा सवाल नितीन गडकरींना केला आहे. जातीवरुन राजकारण करणाऱ्या मोदींनी गडकरी कुठे? कधी? आणि कुठल्या चौकात फोडून काढणार असा सवालच राष्ट्रवादी काँग्रेसने गडकरींना केला आहे.

Loading...
You might also like