टायमिंगचे ‘किंग’, अनेक राजकीय ‘चढ – उतार’ पाहिलेले शरद पवार (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत गाजलेली आणि चर्चेत राहिलेली सभा म्हणजे शरद पवार यांची साताऱ्यातील मुसळधार पावसातील सभा. सभा सुरु असताना अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. ऐरवी पावासामुळे सभा रद्द झाल्याचे पाहिले असेल. मात्र, साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस पडत असताना देखील शरद पवार यांनी आपले भाषण थांबवले नाही. एवढेच नाही तर पावसात भिजत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

शरद पवार यांचा भर पावसात भाषण देतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हयरल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पवारांनी अचूक टायमिंग साधल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर या सभेचा नक्की मतदानावर परिणाम होईल का ? राष्ट्रवादीला याचा किती फायदा होईल ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शनिवारी सकाळपासूनच #SharadPawar हा हॅशटॅग ट्विटरवर पहिल्या क्रमांकाने ट्रेण्ड होताना दिसत आहे. देशातील अनेक नेटकऱ्यांनी ट्विटवरुन पावसात उभे राहून भाषण देण्याच्या पवारांच्या या राजकारणावरील आणि आपल्या कामातील निष्ठेला सलाम केल्याचे पहायला मिळत आहे. अनेकांनी शरद पवार यांचे कौतुक केले आहे तर काहींनी शरद पवार यांच्यावर टीका करत आरोप देखील केले आहेत.

Visit : Policenama.com