सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला CM होतील ? शरद पवार म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून (the first woman Chief Minister of the state) आपण खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याकडे पाहता काय प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar) यांनी अखेर देऊन टाकले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. पवार यांनी नुकतेच एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत यावर पडदा टाकला आहे.

काही दिवसांपासूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे संपादित पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले होते. एखादी कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असे अनेकांच्या मनात आहे, अशी अपेक्षा शेलार यांनी पवारांकडे व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे आपोआपच खासदार सुळे यांचे नाव चर्चेत आले होते. त्यातच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना संधी मिळाल्यास ते पुतणे अजित पवार यांच्याऐवजी ते सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करतील, असे विधान केले होते. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला होता. त्यानंतर पवार यांनी एका दैनिकाला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत यावर पडदा टाकला आहे.

सुप्रियाचा इंट्रेस्ट राष्ट्रीय राजकारणात : शरद पवार

सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. तिचा इंट्रेस्ट राष्ट्रीय राजकारणात आहे. संसदेत आहे. उत्तम संसदपटू म्हणून तिला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, असे सांगत पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेतृत्वाबाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे. राष्ट्रवादीमध्ये तरुण नेत्यांचा मोठा संच आहे. त्या सर्वांमध्ये मान्य होतील अशी अनेक नावे आहेत. त्यात अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे असे अनेक लोक नेतृत्व करण्याच्या क्षमतेचे असल्याचे ते म्हणाले.