लातुरमध्ये सुजय विखे प्रकरणाची पुनरावृत्ती होणार का ?

लातुर : पोलीसनामा ऑनलाईन : (विष्णू बुरगे) – लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विखे पाटील कुटुंबीया सारखा वाद समोर येतो की काय ? अशी चिन्हे दिसत आहेत. जयंतराव काथवटे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे . तर ते काँग्रेसचे जुन्या फळीतील कार्यकर्ते आहेत त्यांची चर्चा सुरू आहे . मात्र त्यांना कुठलाही आदेश पक्षाकडून मिळालेला नाही.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक जिल्ह्यातील उमेदवार द्यावा अशी मागणी केली आहे. जयंतराव हे काँग्रेसचे जुने खंदे समर्थक मानले जातात. मात्र पक्ष त्यांना अधिकृतपणे कसलीही माहिती देत नसल्यानं उमेदवारी त्यांना मिळते की नाही , यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत . तर दुसरीकडे त्यांच्या मुलाने भाजपाच्या गोटात जाऊन संपर्क करून भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळवी यासाठी प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.

आपल्या घरात खासदारकीचा उमेदवार असावा , खासदारकीची उमेदवारी वडिलांना तरी मिळेल अन्यथा आपल्याला तरी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या वेळकाढू भूमिकेमुळे विखे-पाटलांच्या घरातील सुजय विखे पाटलांनी काय चमत्कार केला आहे हे संपूर्ण महाराष्ट्रन पाहिलं आहे . दिग्विजय काथवटे पुन्हा एकदा विखे प्रकरणाची पुनरावृत्ती करतात की काय ? असा प्रश्न उपस्थित होतोय . भाजपाने अद्याप लातूरला उमेदवार कोण असेल हे स्पष्ट केले नाही. आचारसंहिता लागूनही काँग्रेस आणि भाजप आपले उमेदवार स्पष्ट करत नसल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत…