Winter Session 2022 | सत्ताधाऱ्यांना हिवाळी अधिवेशनात घेरण्यासाठी खास ठाकरे ‘नीती’; आयोजित केली आमदारांची खास बैठक…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आज नागपूर येथे सुरू झालेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2022) राज्य सरकारला विरोधकांनी चांगलेच प्रश्न विचारले. विरोधकांनी विशेषतः कर्नाटक सीमाप्रश्न आणि महापुरूषांचा महाराष्ट्रात राज्यपालांकडून केला गेलेला अपमान या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session 2022) पहिला दिवस चांगलाच गाजला. यावेळी विरोधकांच्या काही प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या विधिमंडळातील अनुभवाचा वापर करत धुडकावून लावले. या अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नागपूरात दाखल होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक बोलावली आहे.

 

सत्ताधाऱ्यांना या हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2022) कोण कोणत्या मुद्यांवर घेरायचे याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आज चार वाजता नागपूर येथील हॉटेल रेडिसन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पण आता ही बैठक रद्द करण्यात आली आहे. आणि आज ऐवजी ही बैठक उद्या सकाळी नऊ वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. पण महाविकास आघाडीच्या बैठकीअगोदर उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाची रणणीती ठरवणार आहेत.

जून महिन्यात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमचं उद्धव ठाकरे अधिवेशनात सहभागी होत आहेत. शिवसेना पक्षात झालेल्या बंडाळीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात समोरासमोर येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ते आपल्या आमदारांची एक बैठक घेऊन रणणीती ठरवणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या बैठकीआधी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते ही बैठक घेणार असल्याचे बोलले जात आहे.

 

मुखमंत्री पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी ते आपल्या विधानपरिषद आमदार पदाचा राजीनामा देखील देतील असे जाहीर केले होते.
पण नंतर त्यांनी आमदार म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंसमोर उद्धव ठाकरे या हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2022) नेमकी काय रणणीती आखणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

 

Web Title :- Winter Session 2022 | maharashtra assembly winter session uddhav thackeray reaches nagpur called meeting of mlas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल