Winter Superfoods : थंडीत ‘या’ सुपर फूडचे सेवन केल्याने वाढेल इम्यूनिटी, मोठ्या कालावधीपर्यंत आजारांपासून राहाल दूर

पोलिसनामा ऑनलाइन – Winter Superfoods : भारताच्या काही भागात लोक थंडीचा अनुभव सध्या घेत आहेत. तर अन्य भागात प्रत्येक दिवशी तापमानात किंचित घसरण होत चालली आहे. कोविड-19 महामारीच्या दरम्यान जरूरी आहे की आपण आपल्या डाएटमध्ये अनुकूल बदल करावेत, ज्यामुळे इम्यूनिटी मजबूत होण्यासह मोठ्या कालावधीपर्यंत रोगमुक्त राहाता येईल. थंडीच्या काळात कोणते भारतीय फूड सेवन केल्याने आरोग्य आणि इम्यूनिटी वाढू शकते ते जाणून घेवूयात…

हे सुपर फूड इम्यूनिटी वाढवते

तूप :
कूकिंग ऑईल ऐवजी डाळ आणि भाजीसाठी तूप वापरू शकता. यामुळे चरबी कमी होते आणि उष्णता निर्माण होते.

शेंगदाणे :
यात भरपूर प्रोटीन असतात. शेंगदाणे किंवा भुईमुगाच्या शेंगा उकडून किंवा भाजून खा. यामुळे हृदय देखील निरोगी राहाते.

हिरव्या भाज्या :
पालक, मेथी, सरसो, पुदीना आणि हिरवा लसूण अशा काही भाज्या थंडीत उपलब्ध असतात. यांचा आहारात समावेश करा.

बाजरी :
भाकरी व इतर पदार्थ बनवून बाजरीचे सेवन करू शकता. यामुळे मासपेशी मजबूत होतात आणि केसांचा विकास होतो.

कंदभाज्या : गाजर, बीट, मुळा, कांदा यांचा थंडीमध्ये आहारात समावेश करा. याच्या सेवनाने वजन कमी होते. पचनशक्ती वाढते.

कुळीथ डाळ : काळ्या रंगाची कुळीथ डाळ दक्षिण भारतात जास्त वापरली जाते. ही थंडीत जास्त सेवन केली पाहिजे. किडनी स्टोन, ब्लोटिंगच्या समस्येवर उपयोगी आहे. यात प्रोटीन, फायबर आणि सूक्ष्म पौष्टिक तत्व भरपूर असतात.

तिळ :
तिळाचे सेवन थंडीत आवश्य करा. तिळरमुळे शरीरात उष्णता निर्माण होते. पचनशक्ती, हाडांची कमजोरी यामध्ये लाभदायक आहे.

You might also like