चार तलवारींसह तीन तरूणांना अटक

इचलकरंजी : पोलीसनामा ऑनलाईन – लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पोत्यातून चार तलवारी घेऊन मोटारसायकलवरून निघालेल्या तिघांविरोधात गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सम्मेद तवनाप्पा मायापनूर (२१, रा. जैन बोर्डिंगजवळ), ओंकार राजू राजमाने (२१, रा. जिव्हेश्वर मंदिरजवळ), सौरभ ऊर्फ रघू अर्जुन कुंभार (२०, रा. कच्ची मसुदीजवळ) अशी संशयितांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2448f3b3-d1fa-11e8-acf7-5326b15969dc’]

याप्रकरणी पो. ना. आरिफ दस्तगीर वडगावे यांनी फिर्याद दिली आहे. यातील सम्मेद मायापनूर, ओंकार राजमाने व सौरभ कुंभार या संशयितांनी बिगर लायसेन्स मोटारसायकल चालवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पोत्यातून चार तलवारी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या संशयितांकडून तलवारी व मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

पोलिस ठाण्यात दारू पिऊन गोंधळ

अहमदनगर :  दारू पिऊन एकाने नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरडाओरडा करत गोंधळ घातला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गोरख गजाबापू करांडे (३५, रा. देहेरे, ता. नगर) असे त्याचे नाव आहे. सहाय्यक फौजदार शेख रफिक इस्मान (वय ५७) हे ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत असताना करांडे याने शिवीगाळ, आरडाओरड करत धिंगाणा घातला. त्याला शेख व अन्य पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने धाक दाखवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सहाय्यक फौजदार शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b26dfb9-d1fc-11e8-aaa0-817bb6e7ab3f’]