लष्कराच्या मदतीने गुरुद्वारा गुरुनानक दरबारची पूरग्रस्तांना मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापुरामुळे हजारो कुटुंबाची वाताहात झाल्याने पुरग्रस्तांसाठी गुरुद्वारा गुरुनानक दरबारतर्फे  अंदाजे बारा टन जीवनावश्यक वस्तूंची मदत लष्कराच्या मदतीने हवाई वाहतुकीद्वारे  पोहचविण्यात आल्याची माहिती  गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंह सहानी यांनी दिली.

गव्हाचे पीठ, तेल, टूथपेस्ट, सॅनिटरी नॅपकिन, काडीपेट्या, मेणबत्त्या यासह बारा टन जीवनावश्यक वस्तूंची मदत लष्कराच्या दक्षिण महाराष्ट्र व गोवा मुख्यालयामार्फत हवाई वाहतुकीद्वारे पूरग्रस्त भागात पोहचविण्यात आली. तसेच अतिवृष्टीच्या भागात पुण्यासह अन्य परिसरातही दररोज जेवणाचे पॅकेट पोहचविण्यात आले. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठीही लवकरच शालेय साहित्याची मदत पूरग्रस्त भागात कार्य करणाऱ्या संस्थांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचेही  सहानी यांनी स्पष्ट केले.

यावेळी चरणजितसिंह सहानी यांच्यासह संतसिंग मोखा, विष्णू चमाडीया , विकी ओबेराय, कुलजितसिंह चौधरी, नरेन्द्रसिंह फुल, दलजितसिंह रँक, करमजितसिंह आनंद, सुरेंद्रसिंह धुप्पर, हरमिंदरसिंह घई आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी चमाडीया डिस्ट्रिब्युटर यांचे विशेष सहकार्य लाभले.