Mumbai News : मुलं पळवणारी टोळी गजाआड, 60 हजारात मुलगी तर दीड लाखात मुलाचा करायचे ‘सौदा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवजात बालकांचे अपहरण (kidnapp) करुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने (Crime Branch) सात महिला आणि दोन पुरुष अशा एकूण नऊ जणांच्या टोळीला बेड्या (Arrested) ठोकल्या आहेत. या सर्वांना 21 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक केलेली टोळी साठ हजारात नवजात मुलगी (New born babies) आणि दीड लाख रुपयात नवजात मुलाचा सौदा करत होती. हा सौदा यशस्वी झाल्यानंतर नवजात बाळाची विक्री केली जात होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या टोळीने सहा महिन्यात चार मुलांची विक्री केली आहे. मात्र, ही संख्या अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गुन्हे शाखेने शनिवारी (दि.16) आरती हिरामणी सिंह, रुखसार शेख, रुपाली वर्मा, निशा आहिर, गीतांजली गायकवाड आणि संजय पदम यांना अटक केली.

अटक करण्यात आलेली आरती हिरामणी सिंह ही पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेक्निशियन (Lab Technician) म्हणून काम करते. तीच या टोळीची प्रमुख आहे. या कारवाईत पोलिसांनी आठ मोबाईल (Mobile) फोन जप्त केले आहेत. या फोनमध्ये मुलांचे फोटो आणि व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या रुखसार शेख या महिलेने नुकतेच एका मुलीला विकल्याचे समोर आले आहे.