कोंढव्यात सातव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना कोंढव्यात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. दरम्यान महिलेला विसरण्याचा आजार असून तिच्यावर उपचार होते. त्यातूनतच तिने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बेबिनाझ अय्याझ शिकीलकर (वय ४५, रा. सर्वे नं. ४२, संतोष रेसीडेन्सी समोर, सवेरा पार्क कोंढवा खुर्द पुणे ४८) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबीनाझ शिकीलकर या कोंढवा खुर्द येथे सवेरा पार्क परिसरात राहण्यास आहेत. त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. त्यांना दोन मुलंही आहेत. दरम्यान त्यांना विसरण्याचा मानसिक आजार असल्याने त्यांच्यावर उपचारही सुरु होते. शनिवारी सकाळी त्या परिसरातीलच हदिया हाईट्स या इमारतीमध्ये गेल्या. त्यावेळी त्यांनी सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. त्यानंतर कोंढवा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेबीनाझ यांचा

मृतदेह ससून रुग्णालायात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णलयात पाठविला आहे. संबंधित महिला मनोरुग्ण असल्याची चर्चा असून कोंढवा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

You might also like