प्रसादात गुंगीचे औषध टाकून लुटणारी महिला गजाआड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिर्डी साईमंदीर परिसरात भक्तांना प्रसादात  देऊन भाविकांना लुटणार्‍या परप्रांतीय महिलेस पकडण्यात आले आहे. संस्थानच्या सुरक्षा रक्षकांना तिला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पिंकी प्रकाश पेरीयार (रा. जमशेदपूर, झारखंडम) हे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शिर्डीतील वयोवृद्ध महिला छबुबाई गरड या १९ जून रोजी दुपारच्या आरतींनंतर गुरूस्थान मंदीराजवळ वाटण्यात येणारा प्रसाद घेण्यासाठी उभ्या होत्या़. त्यावेळी एका महिलेने त्यांना प्रसाद दिला़. प्रसाद खाल्ल्यानंतर गरड यांना गुंगी आली. त्यांना गुंगी येताच सदर महिलेने छबुबाई गरड यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व रोकड चोरून नेली.

मंदिर परिसरात गेट नंबर चारजवळ एक वृद्ध महिला पडलेली दिसल्याने संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी दागिने व पैसे चोरीस गेल्याचे सांगितले.

…असे पकडले

संस्थानचे सुरक्षा प्रमुख मधुकर गंगावणे यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला वृद्धेला प्रसाद देत असल्याचे आढळून आले. सदर महिलेचे फोटो काढून ते सुरक्षा रक्षकांना देऊन तिचा शोध घेण्याचा आदेश दिला. संस्थानचे साध्या वेशातील सुरक्षा कर्मचार्‍याने आज मंदीर परिसरात फिरताना संशयित महिलेस पकडून संस्थानच्या सुरक्षा कार्यालयात आणले़. तिची चौकशी केली असता १९ जूनला एका वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन दागिने चोरल्याची कबुली तिने दिली़.

यकृताच्या समस्येसाठी ‘कच्ची पपई’ ठरेल रामबाण उपाय

‘किवी’ हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर

शांत झोपेसाठी रात्री करा ही ‘आसने’

यांनी दिलाय अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

लिंचींग प्रकरणाला जातीय अथवा धार्मिक रंग देऊन त्याचे राजकारण केले जाऊ नये