मुलींना आजही नाहीत मुलांप्रमाणे ‘हे’ 5 अधिकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महिलांच्या अधिकारांचं संरक्षण आणि त्यांना समाजात समान दर्जा देण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्षी वुमेन इक्विलिटी डे सेलिब्रेट केला जातो. 1973 पासून हा दिवस साजरा केला जातो. आजही महिलांना पुरुषांप्रमाणे काही अधिकार दिले जात नाहीत.

1) जोडीदाराची निवड – पुरुषांप्रमाणे महिलांनाही आपल्या मर्जीने आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार असावा. अनेक रुढीवादी कुटुंबातील महिलांना याचा अधिकार नाही. आजही मुली याबाबत खुलेपणानं सांगू शकत नाहीत.

2) मुलींनी काय घालायला हवं आणि काय नाही – याचा निर्णय देखील मुलींपेक्षा इतर लोक जास्त घेताना दिसतात. अनेक भागात तर मुलींनी जिन्स, टॉप, टीशर्ट घातला तर त्यांना सन्मान मिळत नाही.

3) वडिलांच्या संपत्तीतीवर समान अधिकार – वडिलांसाठी मुलगा आणि मुलगी समान असतात. परंतु संपत्तीवर फक्त मुलाचा अधिकार असतो. वडिलांच्या संपत्तीत मुलींना भागिदारी असावी याबाबत कायदा असूनही अनेक कुटुंब याची अंमलबजावणी करत नाहीत.

4) सोलो ट्रॅवलिंग – मुलं आपला मूड फ्रेश करण्यासाठी मित्रांसोबत सोलो ट्रॅवलिंगला जाऊ शकतात परंतु मुलींचं असं बाहेर फिरणं अनेक कुटुंबांमध्ये आजही मान्य नाही. तिला आपल्या इच्छा दाबत चार भिंतीत कैद रहावं लागतं.

5) प्रथा – आपल्या समाजात अशा अनेक प्रथा आहेत ज्यापासून महिलांना वंचित ठेवलं जातं. काही विशेष समाजातील पुरुषांनाच काही रिती रिवांजासाठी मान्यता असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like