इंदापूर तालुक्यात पाझर तलावाच्या पाण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वडापुरी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावात गेल्या दोन वर्षापासून पाणी नसल्याने, या परिसरातील विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. गावात ८ ते १० दिवसातून एकदाच नळाला पाणी सुटत असल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे गावातील महिला पाण्यासाठी आक्रमक झाल्या असून पाझर तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी वडापूरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेकडो ग्रामस्थ महिला बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत.
Wadapuri-Village
वडापुरी परिसरात सध्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याने उन्हाळ्यात व पावासाळ्यात पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गावातील पाझर तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत आहेत. परंतु संबधित खाते पाझर तलावात पाणी सोडत नसल्याने गुरुवार ता.२९ रोजी सकाळ पासून महिला हंडा व कळशी घेवून उपोषणाला बसल्या असुन जोपर्यंत तलावात पाणी येणार नाही तोपर्यंत बेमुत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्या महिलांनी सांगीतले.

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वडापुरी येथे उपोषणाला बसलेल्या महिलांची भेट घेवून त्यांच्याशी पाण्याबाबत चर्चा केली. शेटफळ हवेली तलावात सध्या पाणी चालू असून काही दिवसातच वडापुरी पाझर तलावात पाणी सोडले जाणार असल्याचे सांगून पाण्याबाबतची व उपोषणाची माहिती मा. जिल्हाधिकारी, मा. प्रांत, मा. तहसीलदार व संबंधित खात्याला दिली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले. प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधी यांच्या कामकाजावर नाराजी व खंत व्यक्त केली.

इंदापूर तालुक्यामधील मौजे वडापुरी या गावात प्रथमच महिला उपोषणासाठी बसलेल्या आहेत व गेली ७० वर्षे या गावात पाण्यासाठी अशी वेळ कधीच आली नव्हती. त्यामुळे ही बाब गंभीर स्वरूपाची व सर्वसामान्य ग्रामस्थांच्या व नागरिकांच्या दैनदिन जिवनाशी निगडीत असल्याने हर्षवर्धन पाटील हे स्वतः लक्ष देणार असून पाण्यासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –