‘या’ शहरातील RTO कडून महिलांसाठी ‘ड्रेसकोड’ अनिवार्य, ‘जीन्स-टॉप’वर बंदी

चेन्नई : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये महिलांना वाहन परवान्यासाठी आरटीओच्या काही अजब नियमांचा सामना करावा लागत आहे. हा नियम ड्रेस कोड संबंधित आहे. जो की लिखित स्वरुपात मोटर व्हेइकल अ‍ॅक्टमध्ये अस्तित्वात नाही. असे असतानाही महिलांना हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे.

ड्रायव्हींग टेस्टआधी आपल्या नियमानुसार आरटीओचे अधिकारी निश्चित करतात की टेस्ट देणाऱ्या महिलेने कोणत्या प्रकारचे कपडे घातले आहे. त्यांनी सलवार सूट घातला आहे का नाही ? जर त्यांच्या हिशोबाने महिलेचे कपडे योग्य असतील तर ड्रायव्हींग टेस्टची परवानगी मिळेल अन्यथा महिलांना परत पाठवण्यात येईल.

चेन्नईमध्ये आरटीओच्या इंस्पेक्टर नियम कायद्यापासून वेगळी आपल्या मनाचा कारभार चालतो. टीओआयच्या रिपोर्टनुसार आयटी क्षेत्रात काम करणारी एक महिला के.के. नगर भागातील आरटीओ ऑफिसमध्ये पोहचली तर तिला ड्रायव्हींग टेस्ट देण्यापासून रोखण्यात आले, कारण महिलेचा ड्रेस योग्य नव्हता.

महिलेने सांगितले की मी जीन्स आणि स्लीवलेस टॉप घातला होता. यावर ड्रायविंग टेस्ट घेण्यासाठी इंस्पेक्टरने परवानगी दिली नाही. ते म्हणाले की या कपड्यात ड्रायविंग टेस्टची परवानगी नाही. महिलेला परवान्याची गरज आहे, यासाठी ती आपल्या घरी परत आली आणि सलवार सूट घालून आली.

याआधी पहिल्यांदा आणखी एक महिला कॅपरी आणि शर्ट घालून ड्रायविंग टेस्टसाठी पोहचली परंतू तीला आरटीओमधून परत पाठवण्यात आले. तर जे पुरुष लुंगी आणि शॉर्ट घालून आले होते त्यांना टेस्ट देण्यास परवानगी मिळाली, जोपर्यंत महिला ड्रेस बदलून आली नाही तोपर्यंत तिला ड्रायव्हींग टेस्ट देऊ दिली नाही.

Visit : Policenama.com