प्रेयसीचा गळा चिरुन खून

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरुन खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर गावातील संगिता लाॅजमध्ये घडली आहे. रेणुका धनगर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात प्रियकराविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून केल्यानंतर तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती, रेणुका धनगर हिचे दोन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. प्रियकराने रेणुकाला शिरपूर येथे बोलावून घेतले आणि तिला तेथील संगिता लाॅजवर घेऊन गेला. काही वेळात दोघांचे भांडण झाले व प्रियकराने तीचा गळा चिरुन खून केला. लाॅजमधील कामगार पाणी देण्यासाठी रुममध्ये आला असता त्याला रुमचा दरवाजा उघडा दिसला. त्याने आत डोकावून पाहिले असता त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रेणुकाचा मृतदेह दिसला. त्याने आरडाओरडा करत मालकाला लाॅजमध्ये खून झाल्याचे सांगितले. हाॅटेल मालकाने पोलीसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खूनी प्रियकर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धुळ्यातील लाॅजवर अशाच प्रकारे महिलेचा गळा चिरुन खून करण्यात आला होता. त्यामुळे लाॅजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणावर आला आहे.