Women Safety Hub | अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्यांना झटका, महिलांच्या सुरक्षेसाठी Facebook ने आणलं ‘हे’ नवं फिचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Women Safety Hub | फेसबुकवर आता महिलांच्या समहमतीशिवाय त्यांचे अश्लिल Non-consensual intimate images (NCII) व्हायरल होऊ शकत नाहीत. मेटाने वूमन सेफ्टीसाठी फेसबुकला StopNCII.org सह जोडले आहे. तसेच मेटाने वूमन सेफ्टी हब देखील (Women Safety Hub) जारी केलं आहे. वूमन सेफ्टी हब भारतातील 11 भाषांमध्ये उपलब्ध असून यामध्ये हिंदी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महिला फेसबुकवर सुरक्षित राहण्याच्या विविध टिप्सबाबत माहिती मिळवू शकतात, यासाठी त्यांना मेटाकडून काही विशेष टूलदेखील उपलब्ध करुन दिले जातील.

 

मेटा प्लॅटफॉर्मसचे निर्देशक करुणा नॅन (Karuna Nan) यांनी दिलेल्या माहितीनुसार, META च्या या उपक्रमामुळे सर्व महिलांना या व्यासपीठाचा वापर करता येईल. भाषेशी संबंधित कोणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

 

हे टूल कसं काम करतं?

StopNCII.org हे असे प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उद्देश प्लॅटफॉर्मवर परवानगीशिवाय कोणाचेही फोटो शेअर किंवा व्हायरल होण्यापासून वाचवणं. तसेच पीडितांना या ठिकाणी अनेक टूल मिळताता, ज्यद्वारे ते आपल्या समस्यांच्या तक्रारी करु शकतात. ज्यावेळी एखादा युजर तक्रार करेल. त्यावेळी या प्लॅटफॉर्मवर एक यूनिक आयडीच्या (unique ID) माध्यमातून विवादित पोस्टवर अ‍ॅक्शन घेतली जाईल. (Women Safety Hub)

 

फेसबुकचं ऑटोमेटिक टूल अपलोड केलेल्या फोटोचं स्कॅनिंग करतं.
तक्रार केल्यानंतर हे टूल त्या फोटोच्या आधारे एक खास डिजिटल आयडेंटिफायर जनरेट करतो.
याच डिजिटल डेटाच्या आधारे हे टूल आपल्या पार्टनर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही स्कॅनिंग करते.
ज्यावेळी हे टूल इतर प्लॅटफॉर्मवर सारखाच फोटो पाहतो, त्यावेळी ऑटोमेटिक तो रिमूव्ह करतो,
जेणेकरुन ते फोटो कोणीही पाहू नये. StopNCII.org ने महिलांद्वारे आतापर्यंत रिपोर्ट केलेल्या प्रकरणात या टूलचा रिमूवल रेट 90 टक्के आहे.

META च्या माहितीनुसार, भारतात 33 टक्के महिला सोशल मीडियाचा वापर करतात. तर 67 टक्के भारतीय पुरुष फेसबुकचा वापर करतात.

 

Web Title :- Women Safety Hub | facebook new feature meta new tool for women safety hub check how it will work

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Beed Crime | धक्कादायक ! शाळेतच शिक्षिकेचा विषारी द्रव्य पिवून आत्महत्येचा प्रयत्न; मुख्याध्यापकासोबत वाद?

Nagaland Firing News | नागालँडमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात 11 लोकांचा मृत्यू; परिसरात तणावपूर्ण वातावरण

Pune Crime | जादुटोणाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रारीची धमकी; पुजार्‍याला लुबाडणार्‍या दोघांना अटक; महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा