Beed Crime | धक्कादायक ! शाळेतच शिक्षिकेचा विषारी द्रव्य पिवून आत्महत्येचा प्रयत्न; मुख्याध्यापकासोबत वाद?

माजलगाव (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन – Beed Crime | राजेवाडी (ता. बीड) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा वाद चांगला चिघळला आहे. या वादाला कंटाळून ग्रामस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर शनिवारी या दोघांनाही शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, तत्पूर्वीच शिक्षिका संगीता राठोड यांनी शाळेच्या नवीन इमारतीत विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt To Suicide) केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, राठोड यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. (Beed Crime)

 

राजेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंतचे वर्ग असून आठ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड आणि शिक्षिका संगीता राठोड यांच्यात गेल्या दोन-तीन वर्षापासून वाद सुरू आहे. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी गावकऱ्यांनीही पुढाकार घेतला मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. २६ नोव्हेंबर मुख्याध्यापक जिंकलवाड आणि राठोड यांच्या पुन्हा वाद झाला. त्याचा परिणाम म्हणजे गावकऱ्यांनी स्वत:च शाळेच्या गेटला कुलुप लावे. जोपर्यंत या दोघांपैकी एकाची बदली होत नाही तोपर्यंत शाळा सुरु होऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना सांगितली. दरम्यान, या घटनेची गांभीर्याने दखल घेत शिक्षणाधिकारी यांनी शनिवारी जिंकलवाड आणि राठाेड यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, चौकशीला जाण्यापूर्वीच दुपारी १२ वाजाता शाळेच्या नवीन इमारतीत संगीता राठड यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर माजलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Beed Crime)

संगीता राठोड यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. राठोड यांच्या नातेवाईकांनी मुख्याध्यापकाच्या जाचास कंटाळून संगीता यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना बडतर्फ करा अशी मागणी केली आहे.

 

मला गोवण्यात येत आहे
संगीता राठोड यांच्या नातेवाईकांनी केलेला आरोप मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड यांनी फेटाळला आहे. ते म्हणाले, हा प्रकार नियोजनपूर्वक आहे. शिक्षका आणि त्यांच्या नातेवाईकांकडून मला गोवण्याचा प्रयत्न करण्यात केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Beed Crime | teachers suicide attempt school edge argument headmaster incident in beed district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nagaland Firing News | नागालँडमध्ये दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलांनी केलेल्या कथित गोळीबारात 11 लोकांचा मृत्यू; परिसरात तणावपूर्ण वातावरण

Pune Crime | जादुटोणाचा आरोप करून पोलिसांकडे तक्रारीची धमकी; पुजार्‍याला लुबाडणार्‍या दोघांना अटक; महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा

Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले; पुण्यातील पाषाण परिसरातील घटना