शिर्डीत राज्यातील ५० हजार सरपंच, उपसरपंचांची कार्यशाळा, बुधवारी महत्त्वपूर्ण निर्णय होणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – 31 जलै रोजी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग राज्यातील 50 हजार सरपंच व उपसरपंच यांची देशातील पहिली सर्वात मोठी एक दिवसीय कार्यशाळा शिर्डी येथे घेत आहे. त्यात मानधन सह अतिशय महत्वपूर्ण निर्णय जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अनिल गिते पाटील यांनी दिली.

हा कार्यक्रम अखिल भारतीय सरपंच परिषद च्या विनंती व मागणीनुसार होत आहे. चालू अर्थ संकल्पात सरपंच मानधन साठी 200 कोटींची तरतूद करून सरपंच यांना जुलै महिन्या पासून 5 हजार मानधन देण्याचे जाहीर केले आहे. त्याच बरोबर ग्रामपंचायत यांना बळकटिकरणा व सरपंच यांचे विशेष अधिकार वाढवून काम सुलभ होण्यासाठी तीस पस्तीस मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र घडवताना गाव उभारणीत गाव कारभा-यांना खूप मोठी मदत होणार आहे. या अगोदर शासनाने मागील दोन वर्षा पूर्वी थेट जनतेतून सरपंच निवड हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे गावाला पाच वर्ष काम करण्यासाठी सक्षम सरपंच मिळाला.

चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायती यांना दिला असून त्यामुळे विकासाचे मोठे पर्व राज्यातील प्रत्येक गावात सुरु झाले. राज्य शासनाने 20 मागण्या मंजूर करून त्याचे पत्र काढले आहे. यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये सरपंच कक्ष स्थापन करण्याचे आदेश निघाले आहेत. नवी मुंबई येथे भव्य सरपंच भवण उभारणार असून सरपंचांची त्या ठिकाणी निवासाची उत्तम व्यवस्था केली जाणार आहे. शिडी मेळाव्यात उपसरपंच व सदस्य मानधन त्याच बरोबर राज्यातील सहा विभागातून सहा सरपंच आमदार साठी आरक्षण असावे ही आग्रही भूमिका मांडली जाणार आहे.

या निमित्ताने अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व ग्रामविकास योगदान देणान्यांचा विशेष सत्कार करणार
आहे. पहिल्या सत्रात सरपंच कार्यशाळा मार्गदर्शन व दुसन्या सत्रात सरपंच परिषदेकडून राज्य शासनाचा गौरव सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे राज्य सरकार जोरदार नियोजन करत आहे व त्यांना सरपंच परिषद मदत करीत आहे. अधिवेशन यशस्वी व्हावे म्हणून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सम्पूर्ण ग्रामविकास जोमाने काम करत आहे.

या कार्यशाळेत गावकरमान्यांना खूप काही शिकायला मिळेल म्हणून सरपंच परिषद राज्यभर सरपंच, उपसरपंच  यांना अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे, राज्यभर आढावा बैठका घेऊन अखिल भारतिय सरपंच परिषदेचे राज्यभर नियुक्त निरीक्षक याच्या समवेत जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सीईओ व डेप्युटी सीईओ, तालुका गटविकास अधिकारी यांच्या सर्वांची एकत्रित संयुक्त बैठका राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात चालू आहेत.

किमान 50 हजार सरपंच उपसरपंच येतील असा विस्वास राज्याचे ग्रामविकास सचिव अशिम गुप्ता यांनी
व्यक्त केला आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, उपाध्यक्ष:-दत्ता काकडे, राज्य संघटक अविनाश आव्हाड महिला उपाध्यक्ष अश्विनी थोरात व गीते यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –