World Boxing Championship | भारताला मोठा धक्का! मेरी कोमची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – World Boxing Championship | 6 वेळा विश्वविजेती महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) यंदाच्या बॉक्सिंग महिला विश्व चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे मेरी कोमने माघार घेतली आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण आठ पदके जिंकणाऱ्या 40 वर्षीय मेरीने दुखापतीबाबत अजून कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा यावर्षी 1 ते 15 मे दरम्यान ताश्कंद, उझबेकिस्तान या ठिकाणी पार पडणार आहे. (World Boxing Championship)

 

मेरी कोमची प्रतिक्रिया
मेरी कोमने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार घेतल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “दुखापतीमुळे मी आईबीए महिला वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मी लवकर बरा होण्याचा प्रयत्न करत आहे. मला आशा आहे की या चॅम्पियनशिपमधून आम्हाला आणखी चॅम्पियन्स मिळतील. मी सर्व सहभागींना शुभेच्छा देते.” असे मेरी कोम म्हणाली आहे. (World Boxing Championship)

 

मेरी कोमची कामगिरी
सर्व काळातील महान भारतीय खेळाडूंपैकी एक, मेरी कोम ही जागतिक चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॉक्सर आहे.
पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ती एकमेव महिला बॉक्सर आहे.
आठ जागतिक चॅम्पियनशिप पदके जिंकणारी एकमेव बॉक्सर (पुरुष किंवा महिला) आहे.
दक्षिण कोरियाच्या इंचॉन येथे 2014 च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्ण जिंकणारी मेरी पहिली भारतीय महिला बॉक्सर आणि
2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली. 2021 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही तिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले होते.

 

Web Title :- World Boxing Championship | world boxing championship big shock to india six time champion mary kom withdraws from world boxing championships

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे छगन भुजबळांची मोठी मागणी; म्हणाले…

Vaani Kapoor | पुन्हा एकदा वाणी कपूरच्या बोल्ड अवताराने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Maharashtra ATS | पंजाबमधील गँगस्टर, दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा व सोनू खत्री गँगमधील 3 आरोपींना महाराष्ट्र एटीएसकडून अटक