ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या खेळाडूंची सुरक्षा धोक्यात, BCCI नं लिहीलं ICC ला पत्र

इंग्लंड : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या जगात आयसीसीच्या विश्वचषकाचा ज्वर सर्वत्र दिसत आहे. इंग्लंडमध्ये भारत आणि श्रीलंकेचा सामना चांगलाच रंगला. या समान्यात भारताने विजयश्री मिळवून सेमीफाइनलमध्ये आपली जागा बनवली. हा सामना भारतीयांसाठी आनंदाचा ठरला. परंतून त्याच वेळी एक गंभीर घटना ही या सामन्यादरम्यान घडली.

श्रीलंका आणि भारत यांचा हेडिंग्ले स्टेडियमवर समाना सुरु होता. त्याच वेळी मैदानावरून एका नंतर एक असे तीन विमान गेले. हे विमान कौतुकासाठी किंवा आनंद व्यक्त करणारे नव्हते तर या विमानांवर वेगळ्याप्रकारे राजकीय संदेश देण्यात आला होता. यात भारतीयांविरोधात संदेश देण्यात आला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षतेच्या बाबतीत बीसीसीआयने चिंता व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात आयसीसीला बीसीसीआय़ने पत्र लिहीले आहे. ज्यात भारतीय खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. हेडिंग्लेच्या सामन्यात तीन वेळा राजकीय नारे असलेली विमाने पास झाली, ही गंभीरतेने घेण्याची बाब आहे. पुढील कोणत्याही सामन्यात अशी घटना पुन्हा होणार नाही, याबाबत काळजी घेण्यासाठी बीसीसीआयने आसीसीकडे आश्वासन मागितले आहे. ही सुरक्षा फक्त भारतीय खेळाडूंनाच नाही तर मैदानात येणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनाही देण्यात यावी, असं या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, भारत श्रीलंका सामना सुरु असताना तीन विमाने राजकीय संदेश देत एका मागोमाग मैदानावरून गेली. त्यातील पहिल्या विमानावर “काश्मीर ला न्याय हवा” असा संदेश लिहिण्यात आला होता. दुसऱ्या विमानावर भारताने हिंसाचार बंद करावा आणि काश्मिरला आझाज करावे, असा संदेश लिहिण्यात आला होता. तर तिसऱ्या विमानावर भारतात मॉब लिंचिंग बंद केली जावी, असा संदेश देण्यात आला होता. त्यावर आयसीसीने नाराजी व्यक्त करत मँटेस्टरसह बर्मिंघम येथील पोलीसांशी संवाद साधला. त्यावर पोलीसांनीही दोन्ही शहरांच्या स्टेडियमच्या जवळपासच्या विभागात नो फ्लाइंग झोन घोषित करू, असे आश्वासन दिले.

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय