Coronavirus Lockdown : 9 महिन्यानंतर ‘रंग’ दाखवणार ‘लॉकडाऊन’, मुलं जास्त जन्मणार !

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे पुढच्या वर्षात सुरुवातीला मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण जास्त दिसून येईल. म्हणजे यावेळी तरुण जोडपे लॉकडाऊन आहेत, त्यांच्यामुळे पूर्ण जगात मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण जास्त दिसून येऊ शकते.

हा खुलासा हार्ले थेरेपीचे क्लिनिकल डायरेक्टर डॉ. शेरी जॅकबसन यांनी केला आहे. डॉ. शेरी म्हणाले की, आम्ही केवळ ब्रिटनचा अभ्यास केला आहे कि पुढच्या वर्षी बेबी बूम येईल. पण हे त्या सर्व देशांसाठी लागू आहे, जे लॉकडाऊन आहेत.

डॉ. शेरी जॅकबसन यांनी सांगितले की, यावेळी लोकं जास्त वेळ घरात घालवत असतील तर ते बोर होतील. अशात तरुण जोडप्यांकडून अपेक्षा केली जात आहे कि ते आपल्या पिढीला पुढे नेतील. यामुळे या वर्षाच्या शेवटी आणि पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला बेबी बूमची शक्यता आहे. डॉ. शेरी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे गर्भनिरोधक बनवणाऱ्या कंपन्या बंद आहेत. बाजारातील स्टॉक संपला आहे. अशात या बाबतीत वाटते कि बेबी बूम होईल, कारण जे जोडपे इतके दिवस घरात बंद आहेत ते याप्रकारे आपला तणाव कमी करतील.

भारतातही हीच परिस्थिती आहे. काही लग्न झालेले आणि प्रेमी एकत्र असून ते लॉकडाऊन झाले आहेत. ते एकतर मेडिकल स्टोअर मध्ये काँडम खरेदी करत आहेत किंवा ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरून मागवत आहेत. करणार तरी काय ? चित्रपटगृहे बंद, बाजार बंद, मॉल बंद कुठे जाऊही शकत नाहीत. समस्या अशी आहे की, आता मेडिकल स्टोअरमध्ये काँडमची कमी दिसत असून मागच्या काही दिवसात काँडमच्या विक्रीत २५ ते ५० टक्के वाढ झाली आहे. यात काँडमचे मोठे पॅकेट जास्त खरेदी केले जात आहेत.

मेडिकल स्टोअर वाल्यांनुसार, पहिले छोटे पॅकेट विकले जात होते. पण लॉकडाऊनमुळे मोठे पॅकेट जास्त विकले जात आहेत. बहुधा नवीन वर्षात याची विक्री सर्वात जास्त होते, पण यावेळी लॉकडाऊनमुळे याची मागणी वाढली आहे. काही मेडिकल स्टोअरने काँडमचे स्टॉक ३० टक्के वाढवले आहेत. देशात लॉकडाऊन असूल्यामुळे लोकं घराबाहेर निघू शकत नाहीत. केवळ गरजेच्या वस्तूंसाठी लोकं घरातून बाहेर येत आहेत. यामुळे रेशन, भाजी, औषधे यासह इतर गरजेच्या वस्तू शामिल आहेत.

लॉकडाऊनमध्ये लोकांकडे खूप वेळ असून नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. किंवा त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जे कामामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. किंवा शारीरिक संबंधांना प्राथमिकता देऊ शकत नव्हते. आता त्यांच्याजवळ पूर्ण वेळ आहे.