चाकण मध्ये पंचवीस लाखाचा गुटखा, सुगंधी सुपारी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

बेकायदेशीररित्या गुटखा आणि सुगंधी सुपारी घेऊन जाणारा टेम्पो पकडून २५ लाख रुपयांचा माल जप्त करत दोघांना पकडले. ही कामगिरी शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली आहे. अबुजार जमालुदीन शेख (रा. वसई वालीव चौक, पन्नास पाळा वसई इस्ट, ता. पालघर जि. पालघर) व अरूण रावसाहेब खोत (वय ३२, रा. सुर्दशन नगर, गणेश मंदीराजवळ, पिंपळे गुरव, पुणे) या दोघांना अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e325d1f2-c395-11e8-b95e-e78a4aa0239e’]

पुणे-नाशिक रोडवरून एका टेम्पोतून गुटखा जाणार असल्याची माहिती चाकण जाळपोळमध्ये गंभीर जखमी झालेले पोलीस भापकर यांना मिळाली. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार निलपत्रवार, पोलीस नाईक सातकर व पथकाने पुणे-नाशिक रोडवर भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या येथे सापळा रचून टेम्पो ताब्यात घेतला. त्यावेळी टेम्पोमध्ये मोठा माल मिळून आला आहे.

रायगड नगररचना सहाय्यक संचालकास ४० हजाराची लाच घेताना अटक

२२ लाख ८० हजार रुपयांच्या धोटा विमल गुटख्याची ९५ पोती, २ लाख ४२ हजार ८८० रुपयांची सुगंधी तबाखु व १० लाख रुपयांचा टेम्पो असे एकूण ३५ लाख २२ हजार ८८० रूपयांचा माल कारवाईत जप्त केला. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासणाचे अधिकारी एम डी पाटील व प्रमादे कुमार काकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B00JZHO0O6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff6c491e-c395-11e8-88a9-d5bfaecaa184′]