Yavatmal Crime News | पाणी काढायला सांगून पत्नीला विहिरीत ढकलून केला खून

यवतमाळ : Yavatmal Crime News | शेतातील विहिरीतून पाणी काढायला सांगून तिला विहिरीत ढकलून देऊन पत्नीचा खून (Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. कळंब तालुक्यातील शरद येथे ही घटना घडली. (Yavatmal Crime News)

याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. राहुल मेश्राम (वय ३२, रा. शरद, ता. कळंब) असे त्याचे नाव आहे. पूजा मेश्राम (वय २६) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. (Yavatmal Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी असलेल्या राहुलचा अमरावती येथील पूजाबरोबर २०१६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. राहुल हा पूजाच्या चारित्र्याचा नेहमीच संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात नेहमी वादावादी होत होती. राहुल पूजाला नेहमी मारहाण करीत असे. त्याने कामाचे कारण सांगून २ मार्चला पूजाला शेतात घेऊन गेला. शेतात गेल्यावर त्याने पूजाला विहिरीतून पाणी काढण्यास सांगितले. ती पाणी काढत असताना तिला विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर काही घडलेच नाही असे दाखवून तो घरी परत आला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी विहिरीत पूजाचा मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला.

याबाबत पूजाचे वडिल जगदीश महादेव गजबिये (वय ५९, रा. अमरावती) यांनी फिर्याद दिली असून
त्यावरुन पोलिसांनी राहुल मेश्राम याला अटक केली आहे.

Web Title :-Yavatmal Crime News | Murder by pushing his wife into a well asking him to remove water

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | उद्धव ठाकरे चुकले! ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी, म्हणाले- ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत तर…’

Mumbai Crime News | अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, धर्मेंद्रच्या निवासस्थानी बॉम्बस्फोटाची धमकी, आरोपीला पुण्यातून अटक

NAAC | राज्यातील सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि मानांकन अनिवार्य; अन्यथा प्रवेशप्रक्रिया होणार रद्द