महिला कंडक्टरच्या पतीकडून लाच घेताना डेपो मॅनेजरला अटक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन

बडतर्फ काळातील पगार काढण्यासाठी महिला कंडक्टरच्या पतीकडे १ लाख रुपयांची मागणी करुन त्यापैकी २० हजार रुपये स्वीकारताना डेपो मॅनेजरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली आहे.
विनय तुकाराम गव्हाळ (वय ५५, रा. विभाग नियंत्रक, एस टी महामंडळ, यवतमाळ) असे त्या डेपो मॅनेजरचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11cd1fa1-c2cd-11e8-b334-e724b141b7c5′]

याबाबत बडतर्फ महिला कंडक्टरच्या पतीने तक्रार दिली होती. त्यांच्या पत्नी एसटी महामंडळात कंडक्टर असताना काही कारणाने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. कामगार न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यांनी तो निर्णय डेपोमध्ये दिला. त्यानुसार त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी आणि बडतर्फ काळातील पगार काढण्यासाठी डेपो मॅनेजर विनय गव्हाळ याने १ लाख रुपयांची लाच मागितली.

मुठा कालवा फुटल्याने चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद

पतीने लाच लचुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी २६ सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यात डेपो मॅनेजरने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २७ सप्टेंबरला पोलीस अधीक्षक धिवरे, अतिरिक्त अधीक्षक तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. महिला कंडक्टरच्या पतीकडून २० हजार रुपयांची लाच घेताना विनय गव्हाळ याला पकडण्यात आले. डेपो मॅनेजरने १ लाख रुपयांची लाच मागून २० हजार घेतल्याने खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी करत आहेत.

[amazon_link asins=’B076Y9XVWW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ec4e596-c2ce-11e8-846e-8b705ddaf276′]