Yavatmal News | उमरखेड येथे पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Yavatmal News | सोमवारी दिवसभर राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने झोडपले. मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. या अतिवृष्टीमुळे झालेल्या परिणामामुळे नद्या, नाले तुडुंब भरल्या. पुर आल्याने विदर्भात जलमय वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच विदर्भातील उमरखेड (Umarkhed) येथे पुराच्या पाण्याने रस्त्यावर भरपूर प्रमाणात पाणी साचलं आहे. या पुराच्या पाण्यात एसटी (ST) कलटी होऊन वाहून गेली आहे. (Yavatmal News)

याबाबत माहिती अशी, आज (मंगळवार) 28 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. येथील दहागांव पुलावर (Dahagaon Bridge) पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत होते. त्यातच उमरखेड वरून पुसदकडे ही एसटी जात होती. पुलावरुन जात असताना पाण्याच्या अधिक प्रवाहामुळे एसटी साईटला कलटी झाली. आणि नाल्यातून वाहून गेली आहे. या बसमध्ये ड्राईव्हर, कंडेक्टरसह पाच प्रवासी होते. असे सांगितले जात आहे. तर, पाण्यात वाहून गेलेली ही बस नागपूर आगाराची (Nagpur Depot) असून त्याचा बस क्र. 5018 असा आहे. (Yavatmal News)

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच तहसिलदार आनंद देऊळगावककर (Anand Deulgaonkar) आणि उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे (Amol Malve) यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या, स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. त्यातील प्रवासी, बस चालक-वाहक यांची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हे देखील वाचा

Pune Metro | पुण्यातील मेट्रोचा बांधकाम क्षेत्राला फायदाच : डॉ. ब्रिजेश दीक्षित

Crypto Currencies | संपूर्ण जगात हजारो ‘क्रिप्टोकरन्सी’ पण ‘या’ 10 ‘प्रमुख’, ज्यांच्याबाबत सर्वांना माहित असणे आवश्यक; होईल मोठा ‘नफा’, जाणून घ्या

Petrol Diesel Price Today | डिझेलच्या दरात मोठी वाढ, पेट्रोलही महागले; जाणून घ्या नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Yavatmal News | flood 5 passenger st bus swept away flood waters yavatmal umarkhed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update