इंग्लंडला निघालेलेल्या YES बँकेच्या माजी CEO राणा कपूरच्या मुलीला विमानतळावर रोखलं, कुटूंबाविरूध्द ‘लुक आऊट’ नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येस बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्या संपूर्ण कुटूंबाविरूद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानंतर राणा कपूरची मुलगी रोशनी कपूरला लंडनला जाण्यापासून रोखण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी कपूर मुंबई विमानतळावरून लंडनला जात होती. या दरम्यान, रोशनीला विमानतळावरच रोखण्यात आले आहे. राणा कपूर यांचा जावई आदित्यविरूद्धही लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतील घरावर शुक्रवारी छापा टाकण्यात आला होता. राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना दिलेली कर्जे थकीत झाली. त्यासाठी कपूर यांनी परदेशातील पैसा वापरल्याचा संशय आहे. त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली होती. यांनतर ११ मार्चपर्यंत राणा कपूरला ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.