Yoga for Weight Loss : ‘ही’ 3 योगासन करून सहज कमी करा लठ्ठपणा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येकाला निरोगी शरीर हवे असते. यासाठी सर्वप्रथम लठ्ठपणा कमी करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी तीन गोष्टी महत्वापूर्ण आहेत आणि त्या आहेत, डाएट, एक्सरसाइज आणि तणावमुक्त जीवन. यामध्ये एक्सरसाइज आणि डाइट तर फॉलो होते, परंतु लोक तणाव दूर करू शकत नाहीत. जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा आहे तर तणाव सुद्धा कमी करावा लागेल.

तणाव आणि लठ्ठपणा दोन्हीवर योग उपयोगी आहे. योग केल्याने डोकं शांत राहते आणि मनात नकारात्मक विचार येत नाहीत. रोज योग केल्याने शरीरात उर्जा निर्माण होते, लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.

लठ्ठपणा कमी करणारे प्राणायाम आणि योगासनांबाबत योग एक्सपर्ट नमिता पिपारिया यांनी सांगितले असून त्यांची नावे आणि पद्धत जाणून घेवूयात.

कपालभाती –
कपालभाती प्राणायाम एक प्रकारची ब्रिथिंग एक्सरसाइज आहे. यामध्ये श्वास घेणे आणि सोडण्याची क्रिया जलद केली जाते. यामध्ये शरीर स्थिर आवस्थेत राहते.

व्याघ्र क्रिया –
या आसनात पाय गुडघ्यात दुमडून वरच्या बाजूला घेऊन जातात. हे एका पायाने 8-10 वेळा करा. यानंतर ही क्रिया दुसर्‍या पायाने करावी. हे योगासनाच्या दरम्यान थांबून-थांबून सुद्धा करू शकता.

डीप बेली ब्रिथिंग –
डोळे बंद करून आपले दोन्ही हात पोटावर ठेवा. आता आतमध्ये दिर्घ श्वास घ्या आणि हळुहळु श्वास सोडा. ही एक्सरसाइज केल्याने डोकं शात राहाते. या सोप्या पद्धती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.