Yogesh Gholap Meet Sharad Pawar | बबनराव घोलप यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Yogesh Gholap Meet Sharad Pawar | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena Uddhav Thackeray Group) उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांचे पुत्र आणि माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने राजकारण विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळणार नसल्याचे जाणवल्याने बबनराव घोलप हे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर योगेश घोलप यांनी पवारांची घेतलेली भेट चर्चेत आली आहे. (Yogesh Gholap Meet Sharad Pawar)

दरम्यान, माजी आमदार योगेश घोलप हे देवळाली मतदारसंघातून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे या अजित पवार गटात गेल्याने शरद पवार गटात नाराजी आहे. या नंतर योगेश घोलप यांनी पवार यांची भेट घेतली आहे. (Yogesh Gholap Meet Sharad Pawar)

काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आणि शिर्डी मतदारसंघाचे सह संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. घोलप काही दिवसांपासून नाराज होते. पक्षात डावलले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बबनराव घोलप यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची खात्री असल्याने त्यांनी जोरदार तयारी सुरू केली होती.

दरम्यानच्या काळात घोलप यांना विश्वासात न घेता पक्षाने माजी आमदार सुनील शिंदे यांना शिर्डी लोकसभा मतदार संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्यातच माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश दिल्याने बबनराव घोलप नाराज होते. आगामी लोकसभेच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने घोलप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असलेले बबनराव घोलप हे १९९५ मध्ये युती सरकारमध्ये मंत्री होते.
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातून ते तब्बल पाचवेळा आमदार म्हणून निवडूण आले आहेत.
त्यांचे पुत्र योगेश घोलप सुद्धा शिवसेनेचे आमदार होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा

Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ कोणाचे?
उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस