भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले कंपनीचे एजंट : अरविंद शिंदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी फोर्स कंपनीने एक महिन्यापुर्वी दिलेल्या प्रस्तावावर पीएमपीएमएलने चार दिवसांत अभिप्राय दिला नाही . यामुळे पीएमपीएमएलच्या कोणत्याही प्रस्तावावर निर्णय घेऊ नका असा महापौरांना आदेश देणारे भाजपचे शहरअध्यक्ष योगेश गोगावले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने निषेध केला आहे. फोर्स कंपनीला काम द्यावे यासाठी भाजप शहर अध्यक्ष महापौरांवर दबाव आणत असून संबधित कंपनीसाठी एजंटगिरी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e4c724e0-7954-11e8-8c8b-bd05cf89fe18′]

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले, की फोर्स कंपनीने पीएमपीच्या तीन प्रमुख मार्गांवर तीन महिने प्रायोगीक तत्वावर वातानुकुलीत बसेस चालविण्याचा प्रस्ताव एक महिन्यापुर्वी दिला आहे. तीन महिन्यांच्या प्रयोगानंतर पुढील निर्णय घेण्यात यावा, असे म्हंटले आहे.  पीएमपीएमएल प्रशासनाने यावर कुठलाही अभिप्राय दिलेला नाही. दरम्यान, भाजपचे शहरअध्यक्ष योगेश गोगावले यांनी काल (सोमवार) महापौर मुक्ता टिळक यांना पत्र पाठवून पुढील चार दिवसांत पीएमपीएमएलने अभिप्राय द्यावा. तोपर्यंत पीएमपीएमएलशी संबधित कुठलेच प्रस्ताव मंजुर करू नयेत, अशी मागणी केली आहे. गोगावले हे भाजपचे शहरअध्यक्ष असून मुक्ता टिळक या पुण्याच्या प्रथम नागरिक आहेत. कुठल्याही पक्षाच्या शहरअध्यक्षाने असे जाहीर पत्र पाठवून महापौरांवर दबाब आणणे याचा आम्ही निषेध करतो. यातून गोगावले हे फोर्स कंपनीसाठी एजंटगिरी करत असल्याचे दिसून येते. यापुर्वी कुठल्याही पक्षाच्या अध्यक्षांनी महापालिकेचे प्रस्ताव आणि निविदा मंजुरीसाठी थेट दबाव आणला नाही. त्यामुळे गोगावले यांनी त्यांच्या संघटनात्मक कामात लक्ष द्यावे आणि पालिकेतील पदाधिकार्‍यांना निर्णय घेऊ द्यावा, असा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e69166d-7955-11e8-92a1-d5a937d3d7ed’]

विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनीही गोगावले हे एका कंपनीच्या प्रस्तावासाठी महापौरांवर दबाव आणत असून संबधित कंपनीची दलाली करत आहेत. स्वत: शहर अध्यक्षच दलालीत उतरल्याने ते कोणत्या हक्काने नगरसेवकांवर अंकुश ठेवणार असा चिमटा तुपे यांनी काढला आहे.