‘या’ राज्यात चक्क ‘महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईलवर बंदी’, विद्यार्थ्यांसह प्रोफेसरांची उडाली ‘भंबेरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. योगी सरकारचा हा निर्णय केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या शिक्षकांसाठीही लागू असणार आहे. उत्तर प्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे.

कॉलेज आणि विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षक आपला बराचसा वेळ मोबाईल फोनवर वाया घालवत असतात असं सरकारच्या एका निरीक्षणातून समोर आलं आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांच्या मोबईल फोन वापरावर बंदी असणार आहे असा उल्लेख परिपत्रकात करण्यात आला आहे.
एका इंग्रजी वृत्तानुसार, राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम अध्यापनाचे वातावरण सुनिश्चित करता यावे यासाठी शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढलं आहे.

दरम्यान योगी सरकारच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर आता महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बैठकीदरम्यान काही मंत्री आणि अधिकारी व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचण्यात गुंग असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या मोबाईल वापरावर यापूर्वीच बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी