तुम्ही अ‍ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का ? राऊतांच्या प्रश्नाला CM ठाकरेंचे ‘बेधडक’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतात. त्यावेळी ही मुलाखत प्रचंड गाजते . मुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच मुलाखत घेतली असून या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राऊत यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे बेधडक उत्तर दिले आहे. या मुलाखतीचा काही भाग प्रसिद्ध झाला असून या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या वेगवेगळ्या विचारांच्या पक्षासोबत एकत्र आल्याने शिवसेनेवर होत असलेल्या टीकेला त्यांनी उत्तरे दिली आहेत.

मुलाखती दरम्यान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुम्ही  अ‍ॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का ? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, गुलाबाचा गुलकंद हा बुद्धकोष्ठ झालेल्यांवर उपचारही करतो. मी बाळासाहेबांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेल असे वचन दिले होता. ते वचन पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही थरला जाण्याची तयारी केली होती, असे त्यांनी सांगितले.

मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. पुन्हा येणार असं मी कधीही म्हणालो नव्हतो असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच त्यांनी या सरकारचा पुढील प्लॅन, झालेले वाद, शरद पवार यांच्यासोबतचा अनुभव, तीन पक्षांच्या आघीडचं सरकार चालवण्याचा अनुभव, सीएए, राम मंदिर आदी प्रश्नांना बेधडक पणे उत्तरे दिली. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत शनिवारी (दि.1 फेब्रुवारी) प्रकाशित होणार आहे.