नवीन वाहतूक नियमांना वैतागलात ! पोलिसापासून बचाव करण्यासाठी ‘हे’ आहेत तुम्हाला अधिकार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या मोटार वाहन अधिनियमानुसार वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाकडून पोलिसांकडून नव्या नियमानुसार दंड आकारण्यात येत आहे. चुकून जरी तुम्ही वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला हजारो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. मात्र, नव्या नियमांसंबंधी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस तुमच्या सोबत असे काहीही करू शकत नाहीत.

वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस तुम्हाला थांबवू शकतात. मात्र, तुम्हाला ही काही अधिकार आहेत. त्या अधिकाराचा तुम्ही वापर करू शकता. तुमच्याप्रमाणे वाहतूक पोलिसांना ही काही नियमांचे पालन करावे लागते. तुम्हाला आडवणारा वाहतुक पोलीस कर्मचारी गणवेशात असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्या गणवेशावर बकल क्रमांक आणि त्याचे नाव असणे गरजेचे आहे. या गाष्टी पोलिसाकडे नसतील तर तुम्ही त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी करू शकता. जर त्यांनी ओळपत्र दाखवण्यास नकार दिला तर त्यांना तुमच्या गाडीची कागदपत्र देऊ नका.

एकाद्या वाहतूक पोलिसाने तुम्हाला आडवले तर तुम्ही तुमचे वाहन एका बाजूला घेऊन वाहतूक पोलिसांना सहकार्य करा. त्यांनी कागदपत्रांची मागणी केल्यास त्यांना वाहनाची कागदपत्र दाखवा मात्र, त्यांना देऊ नका. जर वाहतूक पोलिसाने तुमच्या वाहनाची चावी काढून घेतली तर त्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करु शकता. वाहतूक पोलिसांनी गाडीची चावी काढण्याचा अधिकार नाही. तसेच रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली असेल तर पोलिसांना आपण गाडीच्या आतमध्ये बसल्याशिवाय तुमची गाडी क्रेनने उचलता येत नाही.

जर वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले तर ताब्यात घेतल्यानंतर 24 तासांच्या आत दंडाधिकारी यांच्यासमोर हजर होणे आवश्यक आहे. जर वाहतूक पोलिस तुम्हाला त्रास देत असतील तर संबंधित पोलिस ठाण्यात याची नोंद होऊ शकते. आपण वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल लेखी तक्रार करू शकता. तुम्ही वाहतूक पोलिस अधीक्षक (एसपी) किंवा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधीक्षक यांना तक्रार पत्र देऊ शकता.

आरोग्यविषयक वृत्त