शेतात फवारणी करताना तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – तालुक्यातील तरुण शेतकऱ्याचा पिक फवारणी करताना मृत्यु झाला.
सविस्तर माहिती की, सोनगीर जवळील हेंकळवाडी शिवारात रब्बी हंगाम सुरु झाल्याने महेंद हरी पाटील (वय.35) हे दुपारच्यावेळी पिकावर किटक नाशक फवारणी करत होते. या दरम्यान वाऱ्याच्या प्रवाहामुळे किटक नाशक फवारणीचा फवारा चेहऱ्यावर आल्याने नाका तोंडात वारा गेल्याने त्यांना एकदमच गरगरुन आले. ते शेतात जमीनीवर कोसळले तेथे शेतात अन्य मजुरांनी हे पाहताच तातडीने आरडाओरड करत त्याचेकडे धाव घेतली तातडीने उपचारार्थ चक्करबर्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या मदतीने मृतदेह पोसमार्टसाठी पाठविण्यात आला.

दुपारी हि दु:खद वार्ता हेंकळवाडी कळताच सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सोनगीर पोलीस करत आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/