युवक युवतीची एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील क्रांतीनगर येथे एका युवक व युवतीने एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.

फिरोज सय्यद (वय ३२) आणि तरन्नूम शेख (वय २३) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

पोलिसांनी सांगितले, खाडगाव रोड परिसरातील क्रांतीनगर येथे फिरोज सय्यद आणि तरन्नूम शेख या दोघांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. घरातील मंडळी लग्नसोहळ्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याचे पाहून त्या दोघांनी हे कृत्य केले. लग्नावरुन सायंकाळी सर्व जण परत आल्यानंतर घर आतून बंद होते.

दारवाजा उघडून त्यांनी आत प्रवेश केला. तेव्हा दोघांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.