लिफ्ट दिलेल्या तरूणीशी ‘गुप्तगू’ अन् नंतर टेरेसवर ‘अश्लील’ चाळे, पैशाचे वाद झाल्याने तिला 3 र्‍या मजल्यावरून फेकलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून येताना सुंदर तरुणीने हात करून लिफ्ट मगितल्यानंतर त्याने लिफ्ट दिली. येरवड्यात सोडण्याचा तिने आग्रह धरला आणि दोघेही एका इमारतीच्या टेरेसवर गेले. दोघांत अश्लील चाळे झाल्यानंतर मात्र तीने पैसे मागण्यास सुरुवात केली आणि त्या वादातून त्याने तिला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडल्यानंतर त्याने तिचा मृतदेह होळकर ब्रिजखाली टाकून पोबारा केला. पण एक दिवसानंतर पोलिसांना तो शरण आला आणि या खुनाचा उलगडा झाला.

आश्रफ सय्यद (वय 20) असे आरोपीचे नाव असून त्याला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हा गुन्हा कोरेगाव पार्क परिसरात घडला असल्याने हा गुन्हा 0 ने ट्रान्सफर केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्रफ रविवारी रात्री दुचाकीवरून पुणे स्टेशन परिसरातून येत होता. त्यावेळी या तरुणीने त्याला हात करून लिफ्ट मागितली. रात्र असल्याने या तरुणाने तिला लिफ्ट दिली. त्यावेळी तिने खडकीत सोडा असे सांगितले. पण तो मध्येच सोडू लागल्याने तिने येरवडा परिसरात सोडण्याचा हट्ट धरला. यानंतर दोघांत असे काही झाले की तरुण तिला घेऊन कोरेगाव पार्क येथील त्याच्या बहिणीच्या घरी गेला. तिथेही घरी न जाता तो इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला. यानंतर दोघांत अश्लील चाळे झाले. यावेळी तरुणीने त्याला 5 हजार रुपये देण्याची मागणी केली. यावेळी दोघांत वाद झाला आणि त्याने तरुणीला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यात तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मृतदेह होळकर ब्रिजखाली नेहून टाकला.

Visit : Policenama.com 

You might also like