विद्यार्थ्याने कॉलेजच्या आवारात पकडला विषारी साप, पुढे जे घडलं ते होतं भयंकर !

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सर्पमित्र सारखा साप पकडण्याचा स्टंट केला परंतु हा स्टंट त्याला चांगला महागात पडला आहे. महाविद्यालयीन आवारात साप निघाला असून एक विद्यार्थ्याने त्या सापाला आवाराच्या बाहेर जाऊन सोडण्यासाठी उचलले. मात्र साप चांगल्याच चवताळलेल्या अवस्थेत असल्याने सापाने त्या विद्यार्थ्याच्या हाताला डंख मारला. त्या विद्यार्थ्यावर उपचार चालू असून ही घटना जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद शहरात असणाऱ्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या प्रांगणात घडली.

ही घटना ४ दिवसांपूर्वी घडली असून सापाने डंख मारला त्या विद्यार्थ्याचे नाव रवी हिवाळे असे आहे. जेव्हा रवी त्याच्या काही मित्रांबरोबर महाविद्यालयात आला तेव्हा अचानक त्यांना पार्किंगच्या परीसरात साप दिसला. रवीनं त्या सापाला अडचणीतून बाहेर काढलं आणि त्याची शेपटी हातात पकडून त्याला मैदानावर घेऊन आला. साप चवताळला असून त्यानं मुसंड्या मारल्या तरी पण रवी त्याला काही केल्या सोडत नव्हता. त्यामुळे सापाने चवताळून त्याच्या हाताला डंख मारला. सुरुवातीला त्याला एवढे काही वाटलं नाही परंतु नंतर त्याला चक्कर यायला लागले. मैदानात झालेला प्रकार विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितला आणि त्यास तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले.

रवीने या आधी देखील बऱ्याच सापांना पकडून दुसरीकडे सोडले होते, परंतु यावेळेस रवीने केलेले साहस त्याच्या अंगाशी आले. रवी वर जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. परंतु येणारा खर्च हा जास्त असल्याने त्याच्यावर आता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा साप रसेल वायपर जातीचा होता असे समजले असून या जातीचा साप चावल्यास तातडीने उपचार करणे गरजेचे असते. तसेच रसेल वायपर जातीच्या सापाचं विष हे रक्त पातळ करत असते त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने उपचार करून रवीला धोक्याबाहेर आणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी हा एक गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे. रवीला सुरूवातीला खाजगी दवाखान्यात नेले होते. परंतु त्यांना खाजगी रुग्णालयातील उपचारावरील खर्च परवडणारा नव्हता. दरम्यान रवीला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून रवीची तब्येत आता धोक्याबाहेर आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/