धक्कादायक ! सांगलीतील सलगरेत दांडियाचा सराव करताना युवतीचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – नवरात्र उत्सवा निमित्त दांडिया चा सराव करताना ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने एका युवतीचा मृत्यू झाला. पूजा रमेश माळी असे तिचे नाव आहे. मिरज तालुक्यातील सलगरे येथे ही घटना घडली.

पूजा गेल्या दहा दिवसांपासून तिच्या बहीण व इतर महिलांच्या सोबत दांडीया, गरबाचा सराव करीत होती, शुक्रवारी रात्री नेहमी प्रमाणे दांडीयाचा सराव करताना पूजाला चक्कर आल्याने जागेवरच कोसळली. नंतर उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तीचा ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाल्याचे सांगितले. रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करणेत आले.

पूजा सलगरे गावचे माजी उपसरपंच रमेश रामू माळी यांची एकुलती एक मुलगी होती. ती सलगरे येथील विठ्ठल दाजी पाटील महाविद्यालयात विज्ञान शाखेत पहिल्या वर्गात शिकत होती.