राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात, नाथाभाऊंनी कार्यकर्त्यांसाठी केलं ‘हे’ ट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाला साडेचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात झाला आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. अमळनेरवरून जळगावकडे जाताना खडसेंच्या गाडीला अपघात झाला आहे. वाहनचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला असून कारचालकानं प्रसंगावधान ठेवून वाहनावर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, खडसेंच्या अपघाताच्या वृत्तानं कार्यकर्त्यांमधील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी स्वतः एकनाथ खडसेंनी ट्विट करून माहिती दिली आहे.

रविवारी सायंसकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धरणगाव-जळगाव महामार्गावर हॉटेल अमोल समोर ही अपघाताची घटना घडली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम संपवून खडसे हे आपल्या वाहनाने जळगावकडे परतत होते. त्यावेळी वाहनाचे टायर फुटलं. वाहन चालकानं काही क्षणातच वाहनावर नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एकनाथ खडसे सुखरूप असून अपघातग्रस्त वाहन सोडून ते दुसर्‍या वाहनाने जळगावकडे रवाना झाले आहेत.