चाऱ्यावर थुंकल्याचा जाब विचारल्याने तरुणावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दिर भावजईने जनावराच्या चाऱ्यावर थुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी तरुणाला जबर मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याची घटना समोर आली आहे. हडपसर येथील कामठे वस्ती येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी स्वाती विजयकुमार बंदीछोडे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम बाळू राजगे व त्याच्या दोन मित्रांवर हडरपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व गुन्हा दाखल करण्यात आलेला तरुण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी व त्यांचा दिर विनोद बंदीछोडे यांनी त्याला जनावरांच्या चाऱ्यावर थुंकल्याचा जाब विचारला. त्यावेळी त्याचा राग आल्याने त्याने साथीदारांसोबत मिळून विनोद बंदिछोडे यांना मारहाण केली. तसचे त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार घोलप करत आहेत.