स्वारगेट पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्वारगेट पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (गुरुवार) घडली आहे. मात्र, तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील अनिकेत कोथळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात देखील अशाच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’670a22d1-d2d3-11e8-a06c-7f28a7823ce8′]
अजित कल्लप्पा पुजारी (वय-२२ रा. ढोबळवाडी, घरपडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजित हा गवंडी काम करीत होता.
अजित याला स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात कोथरुड परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अजित याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B0716MD8MP,B0741G9HVS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’83c702a7-d2d3-11e8-aa40-4f15451986b7′]
दरम्यान, अजितच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या नातेवाईक आणि मित्रांनी ससून रुग्णालयात गर्दी केली आहे. ससून रुग्णालयात सध्या तणावाचे वातावरण आहे. अजित याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ससून रुग्णालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा अतिरीक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
शवविच्छदेन अहवालानंतर अजितचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजू शकले असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.