अभिनंदन वर्धमान यांच्या मिशीची तरुणाईत क्रेज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मूछ नही तो कुछ नही’ हे  मिशी बद्दलचे वाक्य सर्व भारतभर प्रसिद्ध आहे. याच वाक्याला साजेशी मिशी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आहे. भारतीय हवाई दलात त्यांनी केलेली कामगिरी, त्यांची पाकिस्तानात झालेली अटक आणि सुटला यानंतर त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात घर केले आहे. तसेच तरुण त्यांच्या मिशीचे फॅन झाले आहेत.

बेंगरुळू येथील मोहम्मद चांद या तरुणाने देखील अभिनंदन यांच्या मिशीला भाळून त्यांच्या सारखी मिशी ठेवली आहे. मोहम्मद हा केवळ एकच व्यक्ती नाही, कि ज्याने अभिनंदन यांच्या सारखी मिशी ठेवली आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या शहरातील अनेक तरुण अभिनंदन यांच्या सारखा मिशीचा कट ठेवू लागले आहेत. पुण्यातील एका केश कर्तनालय चालकाने दिलेल्या माहिती नुसार विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानच्या भूमीवर अटक झाल्याची बातमी जशी आली तशी लोकांनी अभिनंदन यांच्या सारखा मिशीचा कट करून देण्याची मागणी करायला सुरुवात केली.

चित्रपटातील नायकाने ज्या प्रमाणे केशभूषा केलेली असते त्या प्रमाणे केशभूषा करण्याची भारतातील तरुणाईला सवय आहे. मात्र एका रियल हिरो प्रमाणे मिशीचा कट ठेवण्याची तरुणाईतील हि क्रेज राष्ट्राभिमान द्विगुणीत करणारी आहे. “मुछे हो तो नथ्थूलाल जैसी, वरना ना हो”, हा अमिताभ बच्चन याच्या ‘शराबी’ चित्रपटातील डायलॉग आता बदलून असा म्हणावा लागेल “मुछे हो तो ‘अभिनंदन’ जैसी, वरना ना हो”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp chat