सावकारकीच्या वादातून तरुणाचा अपहरण करुन खून

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका तरुणाचा सावकारकीच्या वादातून अपहण करुन खून केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. आरोपींनी पुरवा नष्ट करण्याच्या हेतूने तरुणाचा मृतदेह एका विहीरात फेकून दिला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको केला. ही घटना इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे घडली. खून करण्यात आलेल्या तरुणाचे पुण्यातून अपहरण करण्यात आले होते. या घटनेमुळे निमगाव केतकी गावात तणावाचे वातावरण आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6c84ec6-c63f-11e8-afcc-31f57072f8af’]

अनंता सोपान माने (वय-३० रा. गोतोंडी, ता. इंदापूर) असे अपहरण करुन खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अनंता माने हा निमगाव केतकी येथील रहिवाशी असून तो पुण्यामध्ये नोकरीला आहे. खासगी सावकाराने त्याचे अपहरण करुन त्याला निमगाव केतकी गावात घेऊन आले. या ठिकाणी अनंता माने याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी माने याचा मृतदेह निमगाव केतकी गावच्या हद्दीतील एका विहीरीत फेकून दिला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6c84ec6-c63f-11e8-afcc-31f57072f8af’]

मृत अनंता माने याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना गावकऱ्यांनी पाहिला. माने याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना हा प्रकार सांगण्यात आला. नातेवाईकांनी विहीरीजवळ जमा होऊन खासगी सावकाराच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली. तसेच आरोपींना तातडीने अटक करावी या मागणी साठी  संतप्त नातेवाईकांनी इंदापूर-बारामती राज्य महामार्ग दीडतास रोखून धरला. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07908b21-c640-11e8-b12e-d9f8f0bc5eb3′]

संतप्त नातेवाईकांनी राज्य महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. जोपर्य़ंत सावकार व आरोपींना ताब्यात घेत नाही तोपर्य़ंत मृतदेह विहीरीबाहेर काढू देणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण झाले होते. तसेच आरोपींना अटक होईपर्य़ंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6c84ec6-c63f-11e8-afcc-31f57072f8af’]

इंदापूर तालुक्यातील सावकारांकडुन सर्वसामान्य नागरिकांना लुटले जात आहे . जोपर्यंत आरोपीना व सावकारांना अटक केली जात नाही तोपर्यंत हा लढा चालू राहिल असे संतोष भोसले यांनी सांगितले.