तलवार, चाकूचे वार करून भर दिवसा तरूणाचा खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवरील मेसेज आणि प्लॉटिंगच्या वादातून व्यावसायिक तरुणावर २० ते २५ जणांनी तलवार, चाकू, दांडक्यांनी हल्ला चढवून खून केला. ही घटना हर्सूल येथील फातेमानगर भागात भर दुपारी घडली. मोईन मेहमूद पठाण (३५, रा. पटेल नगर, जामा मशिदीजवळ, हर्सूल) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b614cd8e-d039-11e8-87f3-3f09733b51f9′]

हर्सूल परिसरात मोईन पठाण हा विवाहित तरुण प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होता. तो दुपारी चारच्या सुमारास घरी आला असताना काही ओळखीच्या व्यक्ती त्याच्या घरी आल्या व त्यांनी त्यास आपल्यासोबत दुचाकीवरून नेले. फातेमानगरातील सीमा डेअरीजवळ त्यांनी मोईन यास दुचाकीवरून खाली पाडल्यानंतर विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन शेख लाल रसूल पटेल (३८, रा. पटेलनगर, हर्सूल) बाबा रहीम उर्फ बाबा पटेल (४८) आणि बाबा नूर पटेल यांनी व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर आमच्या विरोधात मेसेज का टाकतो आणि प्लॉटिंगच्या व्यवसायातून तू माघार घे, असे म्हणत तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला. यावेळी मोईन याचा भाचा इरफान शेख रहीम (२४, रा. बेरीबाग) हा त्यास वाचविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात इरफानच्या डोक्यावर जबर दुखापत झाली. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना मारहाण सुरूच होती.

[amazon_link asins=’B01L3N38T2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc2d0393-d039-11e8-9e9f-bf91b55ed46c’]

यानंतर मारेकऱ्यांनी पळ काढला. त्यांच्या दहशतीमुळे भांडण सोडविण्यास कोणीही धजावले नाही. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील तरुणांनी गंभीर जखमी मोईन यांना तात्काळ घाटी रूग्णालयात नेले; तसेच घटनेची माहिती हर्सूल पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. मृत मोईनचे वडील अपंग आहेत. मोईन हा विवाहित असून, त्याला तीन मुली, दोन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा चार महिन्यांचा आहे. मोईन हा आई वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. हर्सूल गावातील एका प्लॉटच्या विक्रीतून शेख लालसोबत मोईन यांचे भांडण होते. मोईन यांनी तो प्लॉट ग्राहकाला विकला होता. तोच प्लॉट शेख लाल याला ग्राहकाला विकायचा होता. त्यांचा हा वाद व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर देखील सुरू होता.

ऑनलाईन मद्यविक्रीचे वृत्त खोडसाळपणाचे : बावनकुळेंचे घुमजाव