तरुणाच्या खून प्रकरणात युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला अटक

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन

युवक राष्ट्रवादी तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटीलने गावातील राजेश परशराम फाळके यांच्यावर मंगळवारी रात्री खुनी हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजेश फाळके यांचा गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेश पाटील हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) पथकाने अटक केली आहे.
[amazon_link asins=’B0756VRJ25′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’775fc6a2-b1c1-11e8-a8b4-77e5e6e1c238′]

सन २०१७ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत फाळके आणि त्यांच्या मित्रांनी मदत केली नसल्याच्या रागातून राजेश पाटील याने हे कृत्य केले असल्याची माहिती आली आहे. मंगळवारी राजेश पाटीलने ग्रामपंचायत निवडणूकीत फाळके यांना तुमचे लोक आमच्या मागे का उभा राहीले नाहीत असा जाब विचारत राजेश फाळकेला लाथा – बुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत बरगड्या मोडल्याने राजेश फाळके गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल केले असता गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी राजेश पाटीलच्या विरोधात अॅट्रॉसिटी व खूनी हल्ला केलेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणेला फटकारले 

दरम्यान, तासगाव तालुक्यातील वायफळे येथील राजेश फाळके यांच्या खुनप्रकरणी गुन्हा दाखल झालेले युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांची पत्रकार परिषदेत सांगितले.

एव्हीझेड स्पा मधिल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

जाहिरात