मुमताजच्या मृत्यूची अफवा पसरली, तेव्हा कुटुंब म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सोशल मीडियावर कधीही कोणत्याही सेलेब्रिटीच्या मृत्यूची अफवा पसरवत असतात. आत्ताच अशी बातमी कळली की मुमताजचे निधन झाले, तसं बघितलं तर ही पूर्णत: अफवा पसरवली आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज तिच्या बद्दल झालेल्या अफवांवर तिच्या परिवाराने नकार दिला आणि सांगितले की ती खूप व्यवस्तीत आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या की,  मुमताजचे निधन झाले आहे. तिच्या घरातील एका व्यक्तिने असे सांगितले कि तिची तब्ब्येत चांगली आहे आणि तिला काहीच झालेल नाहीये, कोणीही अशा प्रकारच्या अफवा पसरु नये. त्यांना असा प्रश्न पडला आहे की अशा खोट्या अफवा का पसरवत आहेत.

मुमताजला ७० वर्ष झाले आहेत आणि ती आता लंडनमध्ये तिचा परिवारासोबत राहते. मागच्या वर्षी एप्रिल मध्ये सुद्धा मुमताजचे निधन झाले अशी अफवा पसरवण्यात आली होती त्यावर तिची लहान मुलगी तान्याने सोशल मीडियावर नकार दिला. मुमताजच्या मृत्यूची अफवा एका ट्विटनंतर पसरली. त्यानंतर, चित्रपट निर्माते मिलाप जावेरी यांनी ट्विट केले कि ‘मुमताज आंटी जीवित हैं’ आणि पूर्णपणे ठीक आहे. तो आत्ताच तिच्याशी आणि तिचा भाच्या सोबत बोलाे. ती म्हणते आहे कि अशा अफवा बंद झाल्या पाहिजे.

१९७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी मुमताज ने ‘मेला’, ‘अपराध’ ‘नागिन’, ‘ब्रह्मचारी’, ‘राम और श्याम’, ‘दो रास्ते’ आणि  ‘खिलौना’ अशा अनेक चित्रपटात तिने काम केले आणि आपली झलक सर्वांना दाखवली.